आज आपण सर्व जन फुले दाम्पत्य दिन साजरा करत आहोत कारण आजच्या दिवशी म्हणजे १ जानेवारी १९४८ रोजी भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथील भिडे वाड्यामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली . त्या शाळेमध्ये पहिल्या शिक्षिका म्हणून स्वतः सावित्रीबाई फुले यांनी आपले शैक्षणिक कार्य सुरु केले. त्यामुळे पुढील स्त्री जीवनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटली आणि त्यांच्या आयुष्यला दिशा मिळाली. या कार्यासाठी काल आज उद्या जगाच्या पाठीवर फुले दाम्पत्याचे स्मरण कायम राहीन म्हणून आपण फुले दांपत्या सन्मान दिन साजरा करू.